Print

प्रबोधिनी बद्दल

लोककल्याणकारी राज्यात नागरीकांना मध्यवर्ती ठिकाणी ठेवून विविध कार्यक्रम व योजना तयार करण्यात येतात. या योजनांची प्रभावीपणे व कार्यक्षमरित्या अंमलबजावणी करुन जनतेस त्याचा पुरेपूर लाभ मिळवून देण्याची प्राथमिक जबाबदारी प्रशासनाची असल्याने त्यामध्ये कालानुरुप बदल करणे व त्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते. या बदलत्या परिस्थितीमुळे निर्माण होणा-या आव्हानांना सामारे जाण्याकरीता व व कालानुरुप प्रशासनामध्ये आवश्यक लवचिकता येण्याकरीता सर्व स्तरांवर प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने  दि.23/9/2011 चे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित केले आहे.

महसूल विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना कामकाज विषयक ज्ञान देणे, सर्व स्तरावर महसूल  खाते कार्यक्षम व लोकाभिमुख बनविणे व महसूल विभागातील अधिकारी / कर्माचारी यांना प्रशिक्षण देणे या हेतूने  विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवारात नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली.  सदर संस्थेस दि.14/10/2013 चे शासन निर्णयान्वये  विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था घोषित करण्यात आलेले आहे.
महसूल प्रबोधिनीमध्ये एकूण दोन प्रशिक्षण हॉल असून  प्रत्येकी ५० अशी एकूण १०० प्रशिक्षणार्थी क्षमता आहे. प्रशिक्षण हॉल बैठक व्यवस्था, संगणक, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेट सुविधायुक्त आहे.  निवास व्यवस्थेसाठी 25 रुम्स असून प्रत्येक रुममध्ये 2 याप्रमाणे एकूण 50 प्रशिक्षणार्थींची निवासाची व्यवस्था होऊ शकते.
 
 

शासन निर्णय दि.15/11/2011 अन्वये प्रबोधिनीकरीता खालील पडे मंजूर करण्यात आलेली आहेत

 • एक उपजिल्हाधिकारी,
 • एक तहसिलदार,
 • एक सहाय्यक लेखाधिकारी,
 • 2 अव्वल कारकून ,
 • 1 लिपिक-टंकलेखक व
 • 2 शिपाई

लोककल्याणकारी राज्यात नागरीकांना मध्यवर्ती ठिकाणी ठेवून विविध कार्यक्रम योजना तयार करण्यात येतात. या योजनांची प्रभावीपणे कार्यक्षमरित्या अंमलबजावणी करुन जनतेस त्याचा पुरेपूर लाभ मिळवून देण्याची प्राथमिक जबाबदारी प्रशासनाची असल्याने त्यामध्ये कालानुरुप बदल करणे त्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते. या बदलत्या परिस्थितीमुळे निर्माण होणा-या आव्हानांना सामारे जाण्याकरीता कालानुरुप प्रशासनामध्ये आवश्यक लवचिकता येण्याकरीता सर्व स्तरांवर प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने  दि.23/9/2011 चे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित केले आहे.

महसूल विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना कामकाज विषयक ज्ञान देणे, सर्व स्तरावर महसूल  खाते कार्यक्षम लोकाभिमुख बनविणे महसूल विभागातील अधिकारी / कर्माचारी यांना प्रशिक्षण देणे या हेतूने  विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवारात नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली.  सदर संस्थेस दि.14/10/2013 चे शासन निर्णयान्वये  विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था घोषित करण्यात आलेले आहे.

महसूल प्रबोधिनीमध्ये एकूण दोन प्रशिक्षण हॉल असून  प्रत्येकी 40 अशी एकूण 80 प्रशिक्षणार्थी क्षमता आहे. ú प्रशिक्षण हॉल बैठक व्यवस्था, संगणक, एलसीडी प्रोजेक्टर इंटरनेट सुविधायुक्त आहे.  निवास व्यवस्थेसाठी 25 रुम्स असून प्रत्येक रुममध्ये 2 याप्रमाणे एकूण 50 प्रशिक्षणार्थींची निवासाची व्यवस्था होऊ शकते.

प्रशिक्षणार्थींसाठी चहा, नाष्टा भोजन सुविधा उपलब्ध असून प्रशिक्षण कालावधीत नाष्टा, 3 चहा दोन वेळचे भोजन पुरविण्यात येते. प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या पाण्यासाठी ऍ़क्वागार्ड कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  

शासन निर्णय दि.15/11/2011 अन्वये प्रबोधिनीकरीता एक उपजिल्हाधिकारी, एक तहसिलदार, एक सहाय्यक लेखाधिकारी, 2 अव्वल कारकून , 1 लिपिक-टंकलेखक 2 शिपाई अशा एकूण 8 पदांना मंजूरी देण्यात आलेली असून सर्व पदे भरण्यात आलेली आहे.

 • 01 logo india gov
 • 02 maharashtra
 • aadhar
 • gr
 • logo idrn
 • yashada logo 2012 2